क्राईम
भुसावळच्या दुचाकीस्वाराचा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

भुसावळ – येथील निरंजन दत्तात्रय बोंडे राहणार चक्रधर नगर,भुसावळ हा आपले किराणा दुकान बंद करून आपली दुचाकी क्रमांक MH 19 CC 9937 ने महामार्गावरून घरी परतत असताना पूजा काॕम्प्लेक्स अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने निरंजन याचा जागीच मृत्यू झालेला आहे.याबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.