भुसावळच्या लग्न वऱ्हाडींच्या गाडीचा भीषण अपघात, 2 ठार 4 गंभीर जखमी

जामनेर दि.२३ – जामनेर तालुक्यातील पहुर रस्त्यावरील नागदेवता मंदीरा जवळ अज्ञात वाहनाने कट मारून दिलेल्या धडकेत टाटा इंडीगो गाडीतील एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले असुन तर ३ महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत. अपघातात मृत व्यक्तीचे एक सहा महिन्यांचे बाळ मात्र सुदैवाने सुरक्षीत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की भुसावळ येथील लग्नाचे वऱ्हाडी टाटा इंडिगो क्रमांक (MH 18 W 2412 ) या गाडीने औरंगाबाद रस्त्याने जात होते. जामनेर शहरा जवळील नागदेवता मंदीरा जवळ सकाळी 9.15 वाजे दरम्यान त्यांच्या इंडीगो गाडीला अज्ञात वाहनाने कट मारल्याने या अपघातात भुसावळ येथील पंकज गोविंद सैंदाणे (वय 32) आणी सुजाता प्रविण हिवरे ( वय 30) रा. त्रिमूर्तीनगर ,भुसावळ हे नवदेवाचे नातेवाईक जागीच ठार झाले. तर गाडीतील हर्षा पंकज सैंदाणे आणी नेहा राजेश अग्रवाल या गंभीर जखमी झाल्या दोघांवर जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा जगदिश सैंदाणे यांना पुढील उपचारार्थ जळगांव येथे हलविण्यात आलेले आहे. लग्नासारख्या शुभकार्याला जात असतांना काळाने घात करून दोन जणांना हिराऊन घेतल्याने भुसावळ शहरात शोककळा पसरली आहे. या अपघातग्रस्त टाटा इंडीगो गाडीला कट मारणाऱ्या अज्ञात वाहनाचा जामनेर पोलीस कसून शोध घेत आहेत .