क्राईम

भुसावळच्या व्यक्तीच्या खात्यातून 7 लाख 20 हजार आॕनलाईन लांबवले,सिम कार्ड चालू करण्याचा बहाणा

जळगाव – मोबाईल सिम कार्ड बंद होत असल्याची बतावणी करून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने भुसावळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला ७ लाख २० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेश लक्ष्मण नेमाडे ( वय ६०) रा. भुसावळ हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. त्यांना दिनांक ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका अनोळखी नंबरवरून व्हॉटसॲपवर बीएसएनएल कंपनीचे सिमकार्ड बंद होत असून सिमकार्ड चालू ठेवण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा असा मॅसेज आला. त्यानुसार नेमाडे यांनी दिलेल्या क्रमांकावर फोन केला असता आपण बीएसएसएन कंपनीतून बोलत असल्याची अनोळखी व्यक्तीने बतावणी केली आणि आपले सिमकार्ड बंद होणार असून सिमकार्ड सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला रिचार्ज करावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार अनोळखी व्यक्तीने गुगल प्ले स्टेअरमधून एक ॲप डाऊललोड करण्यास सांगितले. त्या ॲपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने नेमाडे यांच्या मोबाईलचे ऑनलाईन नियंत्रण मिळविले. त्यानुसार नेमाडे यांच्या भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून तब्बल ७ लाख २० हजार रूपये काढून घेतले व फोन कट केला. खात्यातून रक्कम गायब झाल्याचे कळताच आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर नेमाडे यांनी जळगावातील सायबर पोलीसात धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे हे करीत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.