Crime

भुसावळातील अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपीस अटक- अर्चीत चाँडक – सहाय्यक पोलिस अधिक्षक

भुसावळ- दिनांक २२/२/२०२१ रोजी रात्री ९.३० ते ११.३० वाजेच्या दरम्यान पिडित महिला फिर्यादी ह्या पांडुरंग टॉकीजजवळील मुंजोबा मंदीराजवळ उभ्या असतांना एका लाल रंगाचे मोटर सायकलवर एक अज्ञात ईसम त्यांचे जवळ आला व तुम्हाला जेथे जायचे असेल तेथे सोडुन देतो असे सांगीतले. पिडितने त्याचे बोलण्यावर विश्वास ठेऊन त्याचे मागे मोटर सायकलवर बसल्या.
परंतु तो अज्ञात ईसम त्यांना दुस-याच ठिकाणी घेऊन जात असल्याचा संशय आल्याने त्यांनी अज्ञात ईसमाला विचारले की, इधर किधर ले जा रहे हो, तेव्हा तो अज्ञात ईसम म्हणाला की,यहाँ से शॉर्टकट है । हम जलदी पहोच जाऐंगे । पुन्हा पिडित महिलेने त्याचे बोलण्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर अज्ञात ईसम फिर्यादीला वाय पाँईटवरुन साकेगावच्या दिशेने असलेल्या एका शेतात निर्जनस्थळी घेऊन जाऊ लागला. तेव्हा पिडित त्या ईसमाचे गाडीवरुन उडी मारुन त्या पळुन जाऊ लागल्या. तेव्हा आरोपीने त्याचे मोटर सायकल थांबवुन पिडित महिलेचा पाठलाग करुन त्यांना पकडुन तिचे तोंडावर चापटा- बुक्क्यांनी मारहाण केली. सदर वेळी पिडित महिलेन त्या अज्ञात इसमास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु तिची ताकद कमी पडल्याने अज्ञात आरोपीने पिडित महिलेच्या अंगावरिल कपडे फाडुन दोन वेळा तिचेवर शारिरिक अत्याचार केला व पिडीत फिर्यादी ला तक्रार करण्याची किंवा मदत मागण्याची संधी मिळु नये या उद्देशाने तिचे कपडे व मोबाईल फोन जाळुन टाकले. त्यानंतर त्या अज्ञात ईसमाने घटनास्थळी पडलेला मोठा दगड उचलुन तो पिडीत महिलेला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने डोक्यावर मारत असतांना पिडित महिला तेथुन पळत हायवेला असलेल्या एका पेट्रोल पंपावर आल्या व तेथील लोकांची मदत घेऊन पोलीसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलीसांनी त्यांना सुरक्षितरित्या पोलीस ठाण्यात आणुन सहायक पोलीस निरिक्षक रुपाली चव्हाण यांना त्यांची विचारपुस करुन त्यांची तक्रार नोंद करुन घेतली. त्यानंतर सदर गुन्ह्याचे तपासासाठी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सोमनाथ वाघचौरे यांनी सहायक पोलीस अधिक्षक श्री.अर्चित चाँडक यांचे नेतृत्वाखाली सपोनि/अनिल मोरे, सपोनि/मंगेश गोंटला, सपोनि संदीप दुनगहु, सपोनि/रुपाली चव्हाण यांचे सह गुन्हे शोध पथकातील अंमलदार पाहेकॉ/ जितु पाटील, अनिल पाटील, अयाज सैय्यद, पोना/रविंद्र वि. हाडे, किशोर महाजन, उमाकांत पाटील, रमण सुरळकर, दिपक पाटील, विकास सातदीवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, दिनेश कापडणे, योगेश माळी, परेश बि-हाडे, जिवन कापडे, सचिन चौधरी, प्रशांत सोनार यांचे चार तपास पथके तयार करुन लाल रंगाची मोटर सायकलचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले. त्यानंतर पोलीसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत RTO कार्यालय जळगाव यांचेकडुन लाल रंगाची मोटर वापरणा-या इसांची माहिती गोळा केली व त्यांचेकडेस चौकशी सुरु केली. तसेच घटनाक्रम मार्गातील सर्व CCTV कॅमेरे चेक करण्याचे काम सुरु होते. त्यादरम्यान तपास पथकातील सपोनि अनिल मोरे यांना व त्यांचे सोबत असलेले गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी पोना/ रमण सुरळकर, पोना/ उमाकांत पाटील, पोकॉ विकास सातदीवे व पोकों/ प्रशांत परदेशी अशांना गुप्त बातमीदाराकडुन अज्ञात आरोपीची माहिती मिळाली. सदर माहितीची पडताळणी करुन पोलीसांनी भावेश कांतीलाल दंडगव्हाळ,वय 28 वर्षे, रा.शिवकॉलनी, रेलदुनीया, भुसावळ यास अटक करण्यात आली आहे. आरोपीने पोलीस कस्टडी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा श्री. प्रविण मुंढे साो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा. श्री. चंद्रकांत गवळी साो, अपर पोलीस अधिक्षक साो.जळगाव, श्री. सोमनाथ वाघचौरे सो.भुसावळ भाग भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक श्री.अर्चित चाँडक व पोना किशोर महाजन हे करित आहेत.

महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही -सोमनाथ वाघचौरे पोलिस उपअधिक्षक

महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नसून प्रत्येक गुन्ह्याची पाळेमुळे उखडून काढून पिडितांना न्याय देण्यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर आहे. तसेच गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.