भुसावळातील गुन्हेगारीवर आमची खास नजर- SP डाॕ प्रविण मुंढे

भुसावळ- येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात पोलिस वर्धापन दिनानिमित्त आज Raising Day 2021 निमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यात भुसावळ उपविभागातील १) भुसावळ शहर पोलीस स्टेशन ,२) भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन ,३) भुसावळ तालुका पोलीस स्टेशन ,४) नशिराबाद पोलीस स्टेशन कडेस जमा असलेले वाहने तसेच अपघातील वाहने व इतर मुद्देमाल फिर्यादी व संबधीत 26 जणांना जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे,अप्पर पोलिस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी, भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सोमनाथ वाकचौरे यांच्या उपस्थितीत परत करण्यात आलेले आहेत. यापूर्वी फिर्यादी किंवा संबधीतांनी आपला मुद्देमाल परत मिळणेकामी दिनांक ०४/०१/२०२१ सोमवार पासुन ते दिनांक ०७/०१/२०२१ गुरुवार रोजी पावेतो योग्य ते कागदपत्रासह तात्काळ संबधीत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना संपर्क करुन सदर मुद्देमाल दिनांक ०७/०१/२०२१ गुरुवार पर्यंत परत घेऊन जाण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सोमनाथ वाकचौरे यांच्यातर्फे करण्यात आलेले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत फिर्यादी लोकांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून आपआपल्या वस्तू व इतर मौल्यवान ऐवज परत घेतलेला आहे.यावेळी ऐवज परत मिळाल्यानंतर काही व्यक्तींनी आपल्या भावना व्यक्त करून पोलिस प्रशासनाचे आभार मानले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे ,अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलिस प्रशासनाबद्दल लोकांच्या मनात प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
चोरीस गेलेल्या वस्तू फिर्याद दिल्यास नक्कीच परत मिळतील- अप्पर पोलिस अधिक्षक – चंद्रकांत गवळी
आजच्या महागाईच्या काळात आपल्या चोरीस गेलेल्या किंमती वस्तू आपल्याला पोलिसांमार्फत नक्कीच परत मिळतात त्यासाठी आपण तक्रार द्यायला पुढे आले पाहिजे असे मत अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी व्यक्त केले.
जनता व पोलिस यांच्यात आत्मियता निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील- उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सोमनाथ वाघचौरे
2 जानेवारी 1961 साली तत्कालीन पंतप्रधान यांनी महाराष्ट्र पोलिस दलाला स्वतंत्र ध्वज प्रदान केलेला होता.आणि तेव्हा पासून हा दिवस पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो.याचा मुख्य उद्देश जनता आणि पोलिस प्रशासन यांच्यात आत्मियता व आपुलकीची भावना निर्माण व्हावी हा आहे. लोकांच्या अडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस प्रशासन त्यांच्या पाठिशी सदैव तत्परतेने उभे आहे हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. या कार्यक्रमाला तालुका पोलिस स्टेशनचे निरिक्षक रामकृष्ण कुंभार, बाजारपेठचे निरिक्षक दिलीप भागवत आणि भुसावळ शहरचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी केले.