आरोग्य
भुसावळातील नागरीकांना दर्जेदार सुविधा देण्यास प्रयत्नशील- मुख्याधिकारी

सध्या पावसाळा जोरात सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत , तसेच अमृत योजनेच्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली दिसून येत आहे. यामुळे अनेक वाहनधारकांना कमरेचे व मानेच्या मणक्यांचे विकार जडत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.अशा सर्व खराब झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकून डागडुजी करण्यात येणार असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच हतनूर धरणाच्या विसर्गामुळे शहरात गाळयुक्त पाणी येत आहे.तसेच काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने चित्र दिसून येत आहे. यावर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा करण्यात येऊन सर्वांच्या सहकार्याने लवकरच योग्य निर्णय घेण्यात येणार असून नागरिकांना चांगल्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नवीन मुख्याधिकारी संदीप चित्रवार यांनी “मिडिया मेल” न्युजशी बोलताना दिलेली आहे.यावेळी निवडक पत्रकारांच्या वतीने मुख्याधिकारी साहेबांचा सत्कार करण्यात आला.