आरोग्य

भुसावळातील व्यापाऱ्यांना कोव्हिड टेस्ट बंधनकारक – प्रांताधिकारी

दि 19/08/2020 – भुसावळ नगरपरिषद क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भुसावळचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांनी भुसावळ नगरपालिका क्षेत्रातील सर्व दुकानदारांना covid-19 ची टेस्ट करून घेणे बंधनकारक असल्याचा आदेश रोजी काढलेला आहे. ज्या व्यापाऱ्यांकडे आणि दुकानदारांकडे कोव्हिड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र असेल त्यांनाच दुकाने उघडण्याची प्रमुख असेल, असे आदेशात नमूद करण्यात आलेले आहे.
व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ शहरातील मुनिसिपल हायस्कूल ,जामनेर रोड येथे तपासणीसाठी वैद्यकीय पथक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदरील वैद्यकीय पथक कोव्हिड निगेटिव्ह आलेल्या व्यापाऱ्यांना जागेवरच covid-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र देणार आहे.
Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close