भुसावळातील 13 भंगार दुकानांवर SDPO वाघचौरे यांच्या पथकांची धाड

भुसावळ दि-09 – भुसावळ शहरात व परिसरात मोटरसायकल आणि इतर किरकोळ वस्तु चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दुष्टीने मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे साो भुसावळ उपविभाग भुसावळ यांनी सदर मोटरसायकल चोरी व इतर किरकोळ वस्तु चोरीला आळा घाल्याण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या चोरीच्या वस्तुंची विल्हेवाट लावणारे किंवा चोरीच्या वस्तुंची खरेदी करणारे यांना चोरीच्या वस्तु घेण्यापासुन प्रतिबंध करण्यासाठी संबधीत लोकांचे भंगारचे दुकानांवर आणि गोडावूनवर एकाचवेळी शोध मोहीम राबवून पुढील कारवाई करणेबाबत सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चाँडक प्रभारी अधिकारी बाजारपेठ पोलीस ठाणे, पो.नि.दिलीप भागवत बाजारपेठ पोलीस ठाणे पो.नि.बाबासाहेब ठोंबे भुसावळ शहर पोलीस ठाणे,पोनि रामकृष्ण कुंभार भुसावळ तालुका पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते. त्याप्रमाणे आज दि-09/02/2021 रोजी मा.उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे आदेशाप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे,भुसावळ शहर पोलीस ठाणे तसेच भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण 13 भंगार दुकाने /गोडावुन यांची अचानकपणे दहा पोलीस पथकाडुन झाडझडती/तपासणी घेण्यात आली त्यात भंगारचे दुकान/गोडावुन मध्ये खालील प्रमाणे संशयीत वस्तु मिळुन आल्या आहेत.

त्याचे वर्णन खालील प्रमाणे 1] चारचाकी बंद स्थितीतील वाहने – 03
2] तीन चाकी वाहने- 02 [रिक्षा]3] दुचाकी वाहने- 20
4] दुचाकी वाहनाचे इंजिन -2
6]इलेक्ट्रीक मोटर बॉडी-45
7] मोटरसायकल स्पेअर पार्ट-16
8] व्हील डिस्क -04
9] पाईप-8
10] अँगल – 02
11]लोखंडी नवे तार बंडल-2
12जनरेटर-03
13)कंम्युटर सी.पी.यु-01

वरील सर्व वस्तु या संशयास्पद असल्याने सदरचे वस्तुंबाबत प्रमाणे स्वतंत्रपणे पंचनामे करण्यात आले आहेत.सदरचे वस्तुंबाबत मा.न्यायालयात अहवाल सादर करण्यात येणार असुन मा.न्यायालयाचे पुढील आदेशाप्रमाणे संबधीत व्यक्तीवर पुढील योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा.डाॕ प्रविण मुंडे,मा.अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे निर्देशानुसार व मा.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे सो भुसावळ उपविभाग भुसावळ यांचे मार्गदर्शाना खाली सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चाँडक प्रभारी अधिकारी बाजारपेठ पोलीस ठाणे, पो.नि.दिलीप भागवत बाजारपेठ पोलीस ठाणे ,पो.नि.बाबासाहेब ठोंबे भुसावळ शहर पोलीस ठाणे, स.पो.नि.गणेश धुमाळ,अनिल मोरे व बाजारपेठ पोलीस ठाणेचे पोलीस पथक,शहर पोलीस ठाणेचे पोलीस पथक व आरसीबी प्लॉटुन भुसावळ यांनी केली आहे.