भुसावळात अन्न व औषध विभागाची धाड,2 लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ शहरातील अयान कॉलनीतील एमआय तेली शाळेच्या खोलीत जळगाव येथील अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या पथकाने धाड टाकून धडक कारवाई करत 1 लाख 2 हजाराची कोरोना काढ्याची 34 खोके आणि 85000 हजार रुपये किमतीची दोन मशीन असा एकूण एक लाख 87 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आठ दिवसांपूर्वी तक्रारदाराने या शाळेच्या आवारात अन्न व औषधी उत्पादनाचा परवाना नसताना कोरोना काढ्याची औषधी निर्मिती केली जात असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज जळगाव येथील पथकाने शाळेत सकाळी 11 वाजेच्या सुमारास धाड टाकून चौकशी करून मुद्देमाल व मशिनरी जप्त केलेली आहे. ही कारवाई अन्न व औषध सौंदर्यप्रसाधने कायदा कलम 18क अंतर्गत करण्यात आलेली आहे. या शाळेचे मालक आसिफ इसाक तेली यांना नोटीस बजावण्यात आलेली असून सात दिवसाचे आत आवश्यक त्या कागदपत्रांसह खुलासा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत,असा यावेळी पंचनामा करण्यात आलेला आहे. ही कारवाई ए.एम. माणिकराव सहआयुक्त , श्याम साळे प्रभारी सहाय्यक आयुक्त जळगाव तसेच भुसावळ बाजारपेठचे पोलिस काॕ.बडगुजर यांच्या पथकाने केली आहे