पोलिस प्रशासन

भुसावळात अर्चित चांडक या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती,गुन्हेगारांमध्ये खळबळ

भुसावळ- गेल्या 2-3 वर्षांपासून भुसावळ शहरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता भुसावळ शहरात आयपीएस दर्जाचा पोलीस अधिकारी असावा अशी मागणी नागरिकांमधून होत होती. परंतु मध्यंतरीच्या काळात उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांची बदली झाल्यानंतर शिर्डी येथून सोमनाथ वाघचौरे या डॕशिंग अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. SDPO सोमनाथ वाघचौरे यांनी रुजू झाल्याच्या दिवसापासून शहरातील गुन्हेगारीला व बेशिस्त वाहतुकीला बऱ्यापैकी लगाम घातला आहे.तरीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये नवनवीन तरूण गुन्हेगार समोर येत असल्याने भुसावळातील गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून फेकण्यासाठी सोमनाथ वाघचौरे यांच्या जोडीला नागपूर येथून अर्चित चांडक या आयपीएस अधिकाऱ्यांची भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्री चांडक हे नागपूर येथे असतांना त्यांनी अनेक सराईत गुन्हेगारांवर चांगलाच लगाम लावलेला आहे.श्री चांडक हे आज रूजू झालेले असून त्यांनी सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केलेले आहे. यामुळे भुसावळ शहरातील सराईत गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे.आता नवीन आलेले आयपीएस अधिकारी श्री चांडक गुन्हेगारांवर कशा पद्धतीने वचक निर्माण करून आपला दबदबा निर्माण करतात आणि अवैध धंदे बंद करून कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राखतात याकडे भुसावळातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.