क्राईम

भुसावळात गावठी पिस्टल,एअर गन व चाकू जप्त,दोघांना अटक

आज दिनांक 31.08.2020 रोजी 7.00 वाजता
मा.उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गजानन राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून आरोपी क्र.1)सागर योगेश वाघ वय-22 रा.सुतार गल्ली भुसावळ व विधी संघर्ष बालक अनिरुद्ध मुकुंद सपकाळे वय-16 हे भुसावळ शहरात हुडको परिसरात मिळून आल्याने त्याच्या कब्जात खालील गावठी पिस्टल व एअर गन व लोखंडी चाकू मिळून आलेला असून आरोपीना मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आलेले आहे.
तसेच आरोपींकडून
1)20,000रु किंमतीचा गावठी कट्टा जुना वापरता
2)5000 रु किंमतीची एअर गन जुनी वापरती
3)500 रु किंमतीचा चाकू याप्रमाणे मुद्देमाल मिळून आलेला असून सदर आरोपी यास मुद्देमाल निशी भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले असून कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक श्री डॉ. पंजाबराव उगले मा.अप्पर पोलीस अधिक्षिका श्रीमती भाग्यश्री नवटके मा.भुसावळचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन राठोड व मा.पोलीस निरीक्षक श्री दिलीप भागवत, श्री बाबासाहेब ठोबे, श्री रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अनिल मोरे, पोना किशोर महाजन,रमण सुरळकर, समाधान पाटील, रविंद्र बिहाडे, पो कॉ विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, कृष्णा देशमुख अशांनी केली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.