Crime
भुसावळात गोळीबार करणारे दरोड्याच्या इराद्यात होते- SP डाॕ प्रविण मुंढे
भुसावळ- शहरात दरोडा घालण्याचे इराद्याने लपलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांच्या संयुक्त पथकाने झडप घालून ताब्यात घेतलेले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरात दोन जिवंत काडतुसांसह गावठी पिस्तुल आणि दरोड्यासाठी वापरली जाणारी इतर सामुग्री हस्तगत करण्यात आलेली आहे. जळगाव रोडवरील लोणारी हाॕल परिसरात शनिवारी रात्री झालेल्या या कारवाई आधी दरोडेखोरांनी गोळीबारही केल्याचे उघड झालेले आहे. याप्रकरणी आज पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत आज जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी आज भुसावळला भेट देत घटनास्थळी जाऊन पाहणी केली.