Crime

भुसावळात गोळीबार व चाकूने तरूणाचा खून

भुसावळ शहरातील श्रीराम नगरातील भागातील रहिवाशी विलास दिनकर चौधरी वय (38) या तरुणावर काल रात्री ११.०० वाजेच्या सुमारास त्याच्या राहते घरी त्याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार व चाकू हल्ला केल्याने भुसावळ शहरात खळबळ उडालेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विलास दिनकर चौधरी हा घराबाहेर फोनवर बोलत असतांना काळे कपडे घालून ५ ते ६ तरुणांनी ११.०० वाजेच्या दरम्यान हाताच्या दंडाला व पोटाला चाकू हल्ला केला असता विलास चौधरी हा घरात पळत जाऊन दरवाजा बंद केला. व ११.१५ वाजेच्या दरम्यान पुन्हा ते तरुण घराकडे येऊन दरवाजावर दगड फेक करून घराच्या मागील बाजूकडील दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला तसेच ११.१५ वाजेच्या दरम्यान गोळीबार करून घरातून पसार झाले.विलास दिनकर चौधरी हा घरात मयत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.विलास चौधरी यांना ताबडतोब परिसरातील मित्र मंडळींनी डॉ.मानवतकर यांच्या हॉस्पिटल मध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री गजानन राठोड व बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दिलीप भागवत यांनी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.