क्राईम

भुसावळात घरफोडी ,7 लाखांचा ऐवज लंपास

भुसावळ शहरातील वैष्णवीनगर, सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा रस्त्यावरील प्रतिमा महेंद्र मगरे हे लॉकडाउन सुरू झाल्यापासून घराला कुलूप लावून बाहेर गावी अडकले होते.आज रोजी ते घरी परत आले असता घरातील कुलुपाचे कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज उघडकीस आल्याने खळबळ उडालेली आहे. ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठी घरफोडी असल्याचे सांगण्यात येत आहे.घटनास्थळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी रवाना झालेले आहे.कोरोनामुळे सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू केल्याने कित्येक परिवार बाहेर गावी अडकून होते.या दरम्यान चोरीचे मोठे प्रमाण वाढलेले होते.तर कोरोना झालेले रुग्ण उपचार घेत असतांना त्यांची घरे बंद असल्याने याचा फायदा चोरट्यांनी घेऊन अनेक घरांमध्ये लॉकडाउनच्या दरम्यान घरफोड्या केल्या होत्या. लॉकडाउनच्या काळात २० मार्चपासून ते अदयापवतो फिर्यादी प्रतिमा महेंद्र मगरे वय ४८ राहणार वैष्णवीनगर,सिद्धी विनायक आय.टी.आय शिरपूर कन्हाळा हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असतांना अचानक सरकारने लॉकडाउन केल्याने फिर्यादी बाहेर गावी अडकल्या होत्या.आज रोजी ते आपल्या घरी परत आले असता त्यांच्या घराला लावण्यात आलेले कुलूप व कडी कोंडा कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी तोडल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,प्रभारी बाजारपेठ ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे,सपोनि अनिल मोरे,पोना समाधान पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली घरातील सोन्याच्या वस्तू,टी.व्ही.एसी.असे ६ लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना २० मार्च २०२० ते अदयापावतो दरम्यान घडली असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-५ गुरुन ८३७/२०२० भादवी कलम ३८०,४५७,४५४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ ठाण्याचे सपोनि अनिल मोरे सह पोना समाधान पाटील करीत आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.