क्राईम

भुसावळात टरबूजाच्या आडून गांजाची तस्करी उघड,16 लाखांचा मुद्देमाल जप्त

भुसावळ दि-3 भुसावळ उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून दिनांक-03/04/2021 रोजी पहाटेच्या 3 ते 5 वाजेच्या दरम्यान भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वरील नाहाटा चौफुली कडुन जळगावच्या दिशेने गुजरात पासींगच्या GJ-05-BU-0177 व GJ-05-BT-5155 या दोन वाहनांमधुन मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतुक होणार आहे. त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून त्या ठिकाणी पोहचून वाहने अंधारात उभी करुन नाहाटा चौफुली जवळ असलेल्या पाण्याची टाकी व उड्डाण पुलाच्या दिशने मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे गुजरात पासींगची दोन वाहने नाहाटा चौफुली कडुन एकामागे एक पाण्याच्या टाकीच्या दिशेने येत होती. पाण्याचे टाकीसमोर असलेल्या गतिरोधक जवळ सदरची वाहनांचा वेग कमी होताच पोलिस पथकांनी सदरच्या दोन्ही वाहनांना मागील व पुढील बाजुने घेरले. त्यानंतर वाहनांना रोडचे बाजुस थांबवुन त्यातील चालकांना खाली उतरतुन त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांची नावे अनुक्रमे 1) शब्बीर कालेखान पठाण, वय 40 रा. अकबर की वाडी, खोलवड, ता.कामरिज,जि. सुरत, राज्य गुजरात, 2) शेख अकील शेख लतीफ, वय 34, रा. बापु नगर, झोपडपट्टी, खोलवाडा, ता. कामरिज जि. सुरत, राज्य गुजरात 3) शेख शरिफ शेख रफिक, वय 33, रा. मुस्लीम कॉलनी, उस्मानिया मशिद जवळ भुसावळ अशी सांगून उडता उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. त्यानंतर सदर ईसमाना आमची ओळख देऊन त्यांचे ताब्यातील वाहनांची झडती घेण्याचा उद्देश कळवुन त्यांना आमची झडती दिली पंचासमक्षा पोलीसांनी त्यांच्या ताब्यातील दोन्ही वाहनांची झडती घेतली असता, त्या दोन्ही गाडयांच्या हौद्यामध्ये टरबुजाच्या खाली खाकी रंगाच्या प्लास्टीकच्या चिकट पटटीने गुंडाळलेली 28 पाकीटे मिळून आली. ती पाकिटे फॉरेंसिक पथकातील पोना 2900 योगेश नाना वराडे. पोकों 1409 हरीश परदेशी यांनी पंचासमक्ष फोडून त्यांनी त्यांचे कडील ड्रग्स टेस्टींग किटद्वारे तपासणी केली असता,त्यांनी नमुद अंमली पदार्थ हा गांजाच असल्याचे सांगितले.
या घटनेत रू 4,00,000/ किंमतीचे एक अशोक लेलँड गाडी नंबर GJ-05-BU-0177 चा चालक शेख अकील शेख लतीफ व त्याचे सोबतचा इसम शेख शरीफ शेख रफीक यांचे कब्जात मिळाले आहे.या गाडीत अंदाजे रु 4,23,114/ किंमतीचे खाकी रंगाचे प्लास्टीक चिकटपटटी मध्ये गुंडाळलेले 14 पाकीटे त्यात एकुण 70 किलो 519 ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा गाडी नंबर GJ-05-BU-0177 मध्ये मिळुन आलेला आहे.
तसेच रु 4,00000/किंमतीची दुसरी एक अशोक लेलॅंड गाडी नंबर GJ-05-BT-5155 असा असलेली चालक शब्बीर कालेखान पठाण याचे कब्जात मिळालेली असून त्यात रुपये 4,26,798/ किंमतीचे खाकी रंगाचे प्लास्टीक चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेले 14 पाकीटे,त्यात एकुण 71 किलो 133 ग्रॅम वजनाचा ओलसर गांजा गाडी नंबर GJ-05-BT-5155 मध्ये मिळुन आलेला आहे. असा एकूण 16,49,912/- मात्र रक्कमेचा मुद्देमाल ताब्यात घेऊन संशयीत ईसमांना त्यांनी हा मुद्देमाल कोणा कडुन घेतला त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी हमीद समशोद्दीन पलंगवाला, रा.नवीन इदगाहच्या पाठीमागे, भुसावळ याचेकडुन घेतल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे पोलिसांनी छापा पथकातील सपोनि/ गणेश धुमाळ यांना सदर ईसमाचा शोध घेण्यासाठी व त्याचे राहते अजुन गांजा लपवुन ठेवला आहे काय ? या गोष्टीची खात्री करण्यासाठी दोन वेगळया पंचासह पाठविले होते. परंतु सदर ईसम घरी मिळुन आला नाही तसेच त्याचे घरी कोणताही अंमली पदार्थ मिळुन आला नाही. त्यानंतर आम्ही वर नमुद ईसमांना ताब्यात घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणुन त्यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करुन त्यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर-140/2021, NDPS Act- 1985 चे कलम – 20,29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील आरोपी यांना मा.न्यायालयात हजर करण्यात आले असुन तपसाचे अनुषंगाने त्यांची दिनांक- 8 एप्रील 2021 पावेतो पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा श्री. प्रविण मुंढे साो, पोलीस अधिक्षक जळगाव, मा.श्री.चंद्रकांत गवळी ,अपर पोलीस अधिक्षक जळगाव, श्री. सोमनाथ वाघचौरे ,भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधिक्षक श्री.अर्चित चाँडक व पोना/किशोर महाजन हे करित आहेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.