आरोग्य
भुसावळात तरुणावर चाकू हल्ला,दोघांवर गुन्हा दाखल

मयुरेश निंभोरे , 9325250723

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी पवन मोहन चौधरी वय ३० राहणार श्रीराम नगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ९ ऑगेस्ट २०२० रोजी भाजीपाल्याच्या लिलावाच्या कारणावरून आरोपी धम्मा सुरळकर व रितीक नरेंद्र चौधरी राहणार पंचशील नगर या दोघांनी रात्री ८:०० वाजेला फिर्यादी पवन मोहन चौधरी सोबत भांडण करून धम्मा सुरळकर याने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू करून दुखापत केली. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ७७१/२०२० भाग-५ भा.द.वि कलम ३२४,३२३, ५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.तपास पोना निलेश बाविस्कर करीत आहे.