क्राईम

भुसावळात नगरपालिकेची धडक कारवाई,11 दुकाने सील केल्याने खळबळ

भुसावळ दि-06 शहरातील व्यापारी संकुलातील दुकानदारांची गेल्या तीन ते चार वर्षांपासून नगरपरीषदेची मालमत्ता कर व दुकान भाडे थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांची आज दिनांक ६ मार्च २०२१- रोजी सकाळी ११.०० वाजेला धडक मोहीम नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांनी धडक मोहिम राबवून ११ दुकाने सील केल्याने खळबळ उडालेली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, भुसावळ नगरपरिषदेचे भुसावळ शहरात एकूण १२२० व्यापारी संकुल आहेत.यातील थकबाकी असणाऱ्या व्यापाऱ्यांना नगरपरिषदेतर्फे त्वरित थकबाकी भरण्या संदर्भात वारंवार सूचना देऊन नोटीस बजविण्यात आलेल्या होत्या.यानंतरही मोठ्या थकबाकीदारांनी रक्कम अदा न केल्यामुळे दिनांक ६ मार्च २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या सुमारास मा. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार नगरपरीषद भुसावळ यांच्या आदेशाने भुसावळ शहरातील संतोषभाऊ चौधरी म्युनिसिपल मार्केट,स्व.छबिलदास चौधरी कपडा मार्केट,बाबा तुलसीदास उदासी मार्केट, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट,महात्मा फुले मार्केट डी.एस.हायस्कुल काॕम्प्लेक्स अशा मार्केट मधून दुकान भाडे ६२,९७७ रोख रक्कम व ०४,०३,२६८ चेकव्दारे तर मालमत्ता कर ५२,२९९ रोख रक्कम व ०१,०५,६५२ चेकव्दारे स्वीकारून एकूण ०६,२४,१९६ एवढी रक्कम मोठे थकबाकीदार यांच्यावर आज रोजी उपमुख्याधिकारी महेंद्र कतोरे,संकीर्ण विभाग प्रमुख रामदास म्हस्के,लिपिक/ शिपाई गोपाल पाली, मोहन भारंबे,अनिल भाकरे,जय पिंजारी,धर्मेंद्र खरारे अशांनी मिळून वसूल केली.तर काही थकबाकीदारांनी नगरपरिषदेचा मालमत्ता कर व दुकान भाडे अदा न केल्याने पथकाने पाच मार्केट मधील ११ दुकानांना सील लावले आहे. सदरची कारवाई ३१ मार्च २०२१ च्या पाश्वभूमीच्या अनुषंगाने करण्यात येत आहे. तसेच भुसावळ शहरातील इतर थकबाकीदार व्यापाऱ्यांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी लवकरात- लवकर थकबाकी भरावी असे आवाहन नगरपरिषदेच्या कर वसुली विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.