पोलिस प्रशासन

भुसावळात नगरसेवकासह 5 जण तडीपार,आणखी 40 जणांचे तडीपार प्रस्ताव “वेटींग”वर,भुसावळात खळबळ

भुसावळ- शहर पो.स्टे. कडिल हद्दपार प्रस्ताव नं. ०३/२०२०, मुबई पोलीस अधिनियम १९५१ | कलम ५५ प्रमाणेचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांनी सादर केला होता.भुसावळ शहर पोलीस स्टेशन चे भागात वास्तव्यास असतांना भुसावळ शहरात अग्निशस्त्र व घातकशस्त्रासह खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, तसेच दरोडयाचे साहित्यासह, दरोड्याची तयारी, गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देवून दुखापत करणे, नुकसान करणे सारखे गुन्हे करुन अन्य प्रकारे दहशत निर्माण करावयाचे, तसेच भुसावळ शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, तसेच दरोडयाचे साहित्यसह , दरोडयाची तयारी, गैरकायदा मंडळी जमवून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी देवून दुखापत करणे करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
टोळी प्रमुख – १)आतिष रविंद्र खरात,वय-२५,रा.समता नगर भुसावळ ता.भुसावळ जि.जळगांव, टोळी सदस्य- २) राजकुमार उर्फ सनि रविंद्र खरात, वय-२७, रा.समता नगर भुसावळ ता.भुसावळ, टोळी सदस्य – ३) हंसराज रविंद्र खरात, वय-१९, रा,समता नगर भुसावळ ता.भुसावळ, टोळी सदस्य – ४) राजन उर्फ गोलू रविंद्र खरात, वय-२२, रा.समता नगर भुसावळ ता.भुसावळ, टोळी सदस्य – ५)अमोल उर्फ चिन्ना शाम खिल्लारे , वय-२५, रा.देशमुखवाडी रेल्वे RA-II,न्यू वॉटर टेंक, हनुमान मंदिरा जवळ अकोला ह.मु, समता नगर भुसावळ (टोळी सदस्य) हे एकत्र येवुन भुसावळ शहरात सर्वसामान्य नागरीकांवर दहशत निर्माण करुन वेळप्रसंगी त्यांना प्राणघातक हत्याराद्वारे गंभीर दुखापती करुन जबरी चोरी करुन अवैध मार्गाने मिळविलेल्या पैशांवर दारु पिऊन मौज-मजा करुन लोकांमध्ये दहशत निर्माण करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक हा त्याचे स्वत:चे व कुटंबाचे जीविताचे भीतीने त्यांचेविरुध्द उघडपणे तक्रार देण्यास धजावत नाहीत अगर त्यांचे विरुध्द साक्ष देण्यास तयार नव्हते. प्रस्तावित हद्दपार टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गुन्हेगारी वृत्तीचे असुन ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन ते गुंड व खुनशी प्रवृत्तीचे आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता, भुसावळ शहरातील लोकांचे जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने त्यांची वर्तणुक ही सार्वजनीक शांतता व सुव्यवस्थेला वेळोवेळी बाधा निर्माण करणारी झाली आहे.या वरील सर्वांना जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे यांनी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेले आहे.
भुसावळातून आणखी 40 जण तडीपार होणार
याबाबत अधिकृत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील पोलिस दप्तरी अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले आजी-माजी नगरसेवक व बडे राजकीय पदाधिकारी यांसह इतर 40 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या विरोधात तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविलेले असून त्यावर टप्प्याटप्प्याने कारवाई होणार आहेत.यामुळे अनेकांची धाकधूक वाढलेली आहे.कारण काही महिन्यांनंतर येऊ घातलेल्या भुसावळ नगरपरीषदेच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर या सर्वांवर तडीपारीची कारवाई होणार असल्याने भुसावळ शहरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. याचा थेट आणि मोठा परीणाम निवडणूक निकालावर होण्याची दाट शक्यता आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.