राजकीय

रावेर मतदारसंघात रक्षा खडसेंनी विकास केला का ? रोहिणी खडसेंचं धक्कादायक विधान

खडसे परिवार विकासाच्या मुद्द्यावर काय बोलणार ?

मुंबई, दिनांक 24 मार्च, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी संदर्भात आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या ठिकाणी एकनाथराव खडसे, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या रोखठोक प्रश्नाला उत्तर देताना रोहिणी खडसे काहीशा निरूत्तर होऊन गडबडलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या की मी दिलेलं उत्तर तुम्ही कोणत्या अर्थाने घेता यावर सर्व अर्थअनर्थ अवलंबून आहे.
रावेरमध्ये विकास झाला का ?
रोहिणी खडसे यांना विचारण्यात आले की रावेर लोकसभा मतदारसंघात दहा वर्षात विकास झाला का ? यावर उत्तर देताना रोहिणी खडसे काही वेळ निरूत्तर होऊन स्तब्धपणे गडबडल्या आणि म्हणाल्या की तुम्ही माझ्या मतदारसंघात या तुम्हाला त्या ठिकाणी मी आणि मतदार योग्य ते उत्तर नक्कीच देतील. मात्र त्यांना पुन्हा पुन्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला की, रावेरमध्ये खरंच विकास झालाय का ? यावर मतदार म्हणून विकासाबद्दल तुम्हाला काय वाटतं ?  यावर उत्तर देताना रोहिणी खडसे काही वेळ निरूत्तर होऊन स्तब्धपणे गडबडल्या आणि म्हणाल्या की तुम्ही माझ्या मतदारसंघात या तुम्हाला त्या ठिकाणी मी आणि मतदार योग्य ते उत्तर नक्कीच देतील.असे बोलून रोहिणी खडसेंनी सारवासारव केलेली आहे. त्यामुळे उत्तर देताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसलेल्या  हावभावामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात विकास झाला नसल्याचे त्यांना सुचित करायचे होते का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दोन दिवसांपूर्वीच रोहिणी खडसे यांनी माझी आई मंदाताई खडसे यांचा जिल्हा दूध संघात झालेल्या पराभवाला रक्षाताई खडसेच जबाबदार असल्याचा दावा केलेला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याची आता वेळ आलेली आहे, अशी बेधडक प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती.
पुढे रोहिणी खडसे यांना विचारण्यात आले की, बारामतीत सुनेत्रा पवार आणि रावेर लोकसभेमध्ये तुमच्या घरातील रक्षा खडसेंना उमेदवारी दिल्याने महायुतीने शरद पवारांना रोखण्याची योजना आखली आहे का ? याबद्दल काय वाटतं ? त्यावर रोहिणी खडसे म्हणाले की भाजपने आधी शिवसेना फोडली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली फोडा आणि राज्य करा हीच भाजपची नीती असून मतदार त्यांना त्यांची जागा या निवडणुकीत दाखवल्याशिवाय राहणार नाही.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button