भुसावळात प्रफुल्ल लोढाच्या वक्तव्याचा निषेध करत, राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

भुसावळ – जळगाव येथे दोन दिवसांपूर्वी प्रफुल्ल लोढा याने राष्ट्रवादीचे लोकनेते एकनाथराव खडसे यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत जाहीरपणे अपशब्द वापरत अपमान केल्याच्या निषेधार्थ आज भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कृऊबा सभापती सचिन संतोषभाऊ चौधरी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिपक मराठे,जि.प.सदस्य रविंद्र पाटील, शहराध्यक्ष,नगरसेवक नितीन धांडे,नगरसेवक दुर्गेश ठाकूर,माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे आणि इतर कार्यकर्त्यांनी भुसावळ येथील अष्टभुजा मंदिरासमोर प्रफुल्ल लोढा याच्या पुतळ्याचे दहन करत असताना पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतला मात्र प्रफुल्ल लोढा याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच एकनाथराव खडसे यांना राजकीय द्वेषभावनेतूनच “ईडी” ची नोटीस आल्याचा सुद्धा यावेळी निषेध करण्यात आला.याप्रसंगी मोदी सरकार हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या.याप्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.