भुसावळात मृत महिलेचा चुकीचा मृतदेह आला घरी

दि-04/09/2020 भुसावळ येथील खडका रोड भागातील मुस्लीम कॉलनी येथील रहिवासी फातेमाबी पिंजारी वय (65) यांना रक्तदाबाचा त्रास असल्याने मंगळवारी भुसावळ येथील रेल्वेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते.परंतु त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय येथील नाॕन कोव्हिड विभागात हलविण्यात आलेले होते. सदरील महिलेवर उपचार सुरू असताना त्यांची कोरोना तपासणी करण्यात आलेली होती. आणि अहवाल कोरोना निगेटिव आलेला होता. परंतु आज सकाळी नऊ वाजेला त्यांचा उपचारा दरम्यान गोदावरी हाॕस्पीटल मध्ये मृत्यू झालेला होता. मृत्यू झाल्यानंतर जेव्हा त्या महिलेचा मृतदेह पीपीई किट मध्ये पॕकिंग करून भुसावळ येथील घरी आणण्यात आला आणि कुटुंबियांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पीपीई किट उघडले असता ,तो मृतदेह दुसऱ्याच महिलेचा असल्याचे लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली.यानंतर मयत महिलेच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त करीत एकच आक्रोश केला.आणि सदरील गंभीर प्रकाराची माहिती तात्काळ तहसिलदार व पोलिस प्रशासनाला देण्यात आली.या शव अदलाबदलीच्या घटनेमुळे भुसावळ शहरात खळबळ उडालेली असून गोदावरी हाॕस्पीटलचा गलथान कारभार समोर आलेला आहे.