क्राईम

भुसावळात रात्री गोळीबार,मद्यधुंदीत तरूणाचा हैदोस

भुसावळ – काल शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास भुसावळ शहरातील लोणारी मंगल कार्यालयाजवळ मद्यपान करण्यास बसलेल्या तिन मित्रांमधील वाद विकोपाला गेल्यामुळे गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तिघे आरोपी फरार झाले असून पोलिस त्याच्या कसून शोध घेत आहेत. गोळीबार करणा-या तरुणाचे नाव सनी असे असल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे ,भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे दिलीप भागवत आदींनी आपल्या कर्मचारी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बंदुकीची गोळी व काडतुस मिळून आलेले आहे. काही संशयीतांना रात्री चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले आहे. गोळीबार करणा-या सनी या संशयीताच्या पालकांना देखील चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेमुळे भुसावळ शहर पुन्हा हादरले आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.भुसावळ शहरात वारंवार गावठी कट्टे येतात तरी कसे हा एक महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.