क्राईम

भुसावळात वीस हजाराचा ओला गांजा जप्त, पोलिसांची धडक कारवाई

भुसावळ- दि.२६/०२/२०२१ रोजी मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ वाघचौरे सो,भुसावळ उपविभाग यांचे गुन्हेगारीची पाळेमुळे उखाडून फेकण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरूच असून त्यांनी भुसावळ शहर पोलीस स्टेशनला पो. निरीक्षक यांचे चेंबर मधे येवुन पो.निरी. श्री बी.बी.ठोंबे सो,सपोनि श्री विनोदकुमार गोसावी सो,पोहेकॉ साहील तडवी, पो.कॉ.जितेंद्र सोनवणे पो.कॉ.संजय बडगुजर अशांना पो.निरी.सो यांचे चेंबर मध्ये समक्ष बोलावुन त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत, भुसावळ शहरात यावल रोडने गांधी पुतळ्या जवळ एक ईसम वय अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटाचा ज्याने अंगात आकाशी पांढरा फुलाफुलांचा नक्षी असलेला शर्ट व काळ्या रंगाची फुलट घातलेली आहे. तो साधारण रात्री ०१.३० वाजेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गांजा विक्री करीता स्कुलबॕग मध्ये आणणार आहे अशी विश्वसनीय बातमी मिळाली आहे. सदर इसमावर योग्य ती कारवाई करण्याचे मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ वाघचौरे यांनी आदेशीत केलेवरून सपोनि गोसावी व पथक हे दोन लायक पंचाना घेवुन रेड करणेकामी गांधीपुतळ्या गेले व त्या परिसरात सापळा लावला असता रात्री ०२.१० वाजेच्या सुमारास इसम नामे राकेश भिमराज नटकर वय ३० वर्ष राठी आंकारेश्वर मंदीराजवळ, न्यू सातारा हा पायी आपले पाठीवर एक स्कुलबॕग घेवुन संशयीत आढळून आला. त्यास घेराव घालुन ताब्यात घेतला असता त्याचे पाठीवरील स्कुल बॕगेत २ किलो वजनाचा किंमत २०,०००/- रु.किमतीचा ओला गांजा मिळून आला. राकेश भिमराज नटकर वय ३० रा. न्यूसातारा, ओंकारेश्वर मंदिरा जवळ भुसावळ हा दोन किलो वजनाचा २०,००० /- रुकिमतीचा ओला गांजा विक्री करिता त्याचे ताब्यात बाळगतांना मिळून आल्याने पो शि १८७५/ जितेंद्र सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याची दिलेवरुन भुसावळ शहर पो स्टे येथे भाग ६ गुरव ३७/२०२१ फलम २०,२१ एन.डी. पी.एस.कायदा कलम २०,२९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि विनोदकुमार गोसावी करीत आहे. सदरची कारवाई ही मा पोलीस अधिक्षक श्री प्रविण मुंडे सी, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी सो. व मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सोमनाथ बाघचौरे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठवे, स पो नि विनोदकुमार गोसावी, पो हे का साहील तडवी, पो शि जितेंद्र सोनवणे, पो शिक संजय बडगुजर यांनी केली.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.