क्राईम

भुसावळात सुनेने केली सासूची निघृण हत्या, विळ्याने केले वार

भुसावळ- शहरातील गजानन महाराज नगर भागातील महिला कोटेचा विद्यालयातील वाॕचमन यांच्या आईच्या मानेवर सुनेने लोखंडी विळ्याने वार केल्याची घटना आज सायंकाळी सहा 6:40 वाजेच्या सुमारास उघडकिस आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीमती पद्माबाई विद्यालय प्राथमिक व बालवाडी विद्या मंदिर माध्यमिक विद्यालय गजानन महाराज नगर भागातील महिला कोटेच्या विद्यालयात 8 वर्षापासून वा़ॕचमन नोकरी करणाऱ्या रविंद्र सोनवणे व त्यांची पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे असा परिवार रहिवास करतो. दिनांक २/६/२०२१ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हा किराणा दुकानावरती माल खरेदी करण्यासाठी गेला असता, त्यादरम्यान रविंद्र सोनवणे यांची पत्नी उज्वला रविंद्र सोनवणे यांची व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यात घरगुती वाद झाला. हा वाद खूपच विकोपाला जाऊन उज्वला सोनवणे यांनी धारदार शस्त्र विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून ठार मारल्याची घटना सायंकाळी 06:40 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.

सदरील घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे ,प्रशिक्षणार्थी उप अधिक्षक नितीन गणापुरे ,शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सपोनि संदीप दूनगहू, विनोदकुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान मयत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आलेला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.