Crime

भुसावळात हजारो बेशिस्त वाहन चालकांना 51 लाखांपेक्षा जास्त दंड-श्री सोमनाथ वाकचौरे उ.पो.अधिकारी

भुसावळ- :दि ०१/१२/२०२० ते दि ३१/१२/२०२० पावेतो भुसावळ शहरात शहर वाहतूक शाखा भुसावळ यांचे कडून मो.वा.का. अन्वये केलेली कारवाई बाबत भुसावळ शहरात मोठया प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असून काही बेशिस्त वाहन चालक यांचे विरूद्ध मोहीम राबवून मा.श्री. सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भुसावळ भाग भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. बाबासाहेब ठोंबे, स.पो.निरीक्षक श्री. गणेश धुमाळ शहर वाहतूक शाखा भुसावळ कडील वाहतूक शाखेचे कर्मचारी यांचे मदतीने व RCP प्लाटूनसह माहे डिसेंबर मध्ये ४८४२ वाहन धारकांविरुद कारवाई करण्यात आलेली आहे. व १०,१४,७००/- रुपये दंड वसुल करण्यात आलेला आहेत. तसेच सदर महीन्यात १,४८०००/- रु पेंडींग दंड वसुल करण्यात आलेला आहे. माहे डिसेंबर मध्ये १५ केसेस रिक्षा चालक, फैन्सी नंबर प्लेट ०३ मो.सा तसेच १०८ नंबर प्लेट खराब , वाहन चालविण्याचा परवाना जवळ न बाळगणे २३३७, तिन सिट -१२४, बिना गणवेश परिधान करुन -२८,सिट बेल्ट- १८२, पोलीस इशाराभंग करणे -६११, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे-६०, व ३७६५ इतर मो.वा.का.अन्वये केसेस दाखल करण्यात आलेल्या आहे. तसेच शहर वाहतुक शाखा भुसावळ कडील जाने-२०२० ते डिसेंबर २०२० पावेतो २४,४०९ वाहन चालकविरुध्द कारवाई करण्यात आलेली असुन ५१,६६,५००/- रु.इतका दंड आकारण्यात आलेला आहे. मा.श्री. सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भुसावळ भाग भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली दि- १७/१०/२०२० ते दि २७/०१/२०२० पावेतो ११,३९४ केसेस करण्यात आलेले असुन २४,२२,९००/- रू चोविस लाख, बाविस हजार ,नऊशे रुपये दंड) आकारण्यात आलेला आहे. तरी यापुढे अवैध प्रवाशी वाहतुक वाहन चालक, बेशिस्त वाहन चालक, रिक्षा चालक विना युनिफॉर्म ,विना लायसन्स, ट्रिपल शिट मोबाईल फोनवर बोलणे, रॉग साईड वाहन चालविणे हेल्मेट परिधान न करणे, विना नंबर प्लेट,/विचित्र नंबर प्लेट वाहन, अल्पवयीन मुले मुली वाहन चालविणे इत्यादी नियमांचे भंग करणारे वाहन चालकाविरुध्द कडक कारवाही करुन सतत मोहीम राबविण्यात येत आहे. तसेच वाहतुकीसारहदरीस अडथळा निर्माण करणारे हातगाडी , लोटगाडी इ. बाबत कारवाई शहर वाहतूक शाखा भुसावळ कडून करण्यात येणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.