क्राईमरेल्वे संबंधी

भुसावळात CBI ची धाड,2 अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले

भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ डीआरएम कार्यालयातील वरीष्ठ मंडळ अभियंता यांचेसह एकाला आज डिआरएम अधिकाऱ्यांच्या दालनातच 2 लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने रेल्वेतील लाचखोर अधिकाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडालेली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एम एन वाय कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड प्रा.लि. मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या तक्रारीवरून आज भुसावळ येथील डिआरएम कार्यालयात सापळा रचण्यात आला. यात वरीष्ठ अभियंता एम.एल. गुप्ता व कार्यालय अधिक्षक संजय रडे या दोन अधिकाऱ्यांना दोन लाख चाळीस हजारांची लाच घेताना आज नागपूर सीबीआयच्या 11 जणांच्या पथकाने आज 16 ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी 12.40 वाजेच्या सुमारास डीआरएम कार्यालयातील अभियंता अधिकाऱ्यांच्या दालनातच लाच घेताना वरीष्ठ अधिकाऱ्यांना अटक केल्याने खळबळ उडालेली आहे.
यानंतर अभियंता एम एल गुप्ता यांच्या शासकीय निवासस्थानी मोठे घबाड सापडलेले असून संपूर्ण निवासस्थानातील कागदपत्रे व रोख रकमेची मोजणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.