भुसावळ उपनगराध्यक्षपदी रमेश नागराणी यांची बिनविरोध निवड
भुसावळ- आज भुसावळ नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत जेष्ठ नगरसेवक श्री रमेश नागराणी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी असलेल्या तहसीलदार श्री दिपक धिवरे यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.
याप्रसंगी मुख्याधिकारी संदीप चित्रवार नगरसेवक युवराज लोणारी,गटनेते मुन्ना तेली,मनोज बियाणी,राजेंद्र नाटकर,महेंद्र सिंग ठाकूर,राजू आवटे व इतर नगरसेवक उपस्थित होते.
त्यानंतर नूतन उपनगराध्यक्ष श्री रमेश नागराणी यांचा जळगाव रोडवरील काच बंगल्यात सत्ताधारी गटाच्या नगरसेवक यांनी फुलहार आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक सुनिल नेवे,मनोज बियाणी,दिनेश राठी,युवराज लोणारी ,प्रकाश बत्रा,किरण कोलते मा.नगरसेवक राजू सुर्यवंशी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजयभाऊ सावकारे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जेष्ठ नगरसेवक श्री रमेश नागराणी यांना एकमताने संधी देण्यात आलेली असल्याचे नगरसेवक प्रा.सुनिल नेवे यांनी जाहीर केले. नगरसेवक रमेश नागराणी यांच्या निवडीने सिंधी समाजाला 22 वर्षानंतर उपनगराध्यक्षपद मिळाल्याने सिंधी समाजात उत्साहाचे वातावरण आहे.