क्राईम

भुसावळ जवळ ट्रॕव्हल्स व ट्रेलर यांच्यात भीषण अपघात,1ठार

भुसावळ- सध्या जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक 6 चे काम सुरू असून त्यामुळे भुसावळ परीसरात रहदारीत वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने वारंवार अपघात घडत आहेत.यातच आणखी काल भुसावळ तालुक्यातील कपिल नगर वस्ती येथे मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास ट्रॉली व ट्रॅव्हल्स यांच्यात भीषण अपघात होऊन या अपघातामध्ये एक जण ठार तर सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत.

कपिल नगर वस्तीजवळ महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे. मुंबईहून येणारा ट्रेलर व सुरतला जाणारी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांचा मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये एक जण ठार झालेला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे आहेत अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.