क्राईम
भुसावळ झेडटिएस जवळ धावत्या रेल्वेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू


दि-08/08/2020
भुसावळ झेडटिएस परीसरातील रेल्वे लाईनजवळ कोणत्या तरी एका धावत्या रेल्वेचा जोरदार धक्का लागल्याने मार लागून दूर फेकले गेल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 8.10 मि. झेडटिएस परीसरात घडलेली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की रमेश हिरामण सुरवाडे वय 46 रा. महादेव टेकडी जवळ, कंडारी ता. भुसावळ हे आज सकाळी झेडटिएस रेल्वे यार्ड परिसरातील डिएचई पोल नं 12 डिजीएल 0607 गेट क्रमांक 175 जवळील रेल्वेलाईन जवळ खाली पडलेले आढळून आले. त्यांना लागलीच वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले असता डाॕक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यात इडी क्र. 38/2020 सीआरपीसी कलम 174 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.