भुसावळ तालुका मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी जे.पी.सपकाळे

भुसावळ- तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची त्रैवार्षिक निवडणूक भुसावळ येथील श्री गाडगेबाबा हायस्कूल येथे पार पडली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी निवडणुक निरीक्षक तथा यावल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जयंत चौधरी होते. तर जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव जी.आर. चौधरी, जिल्हा संपादक सदस्य अरूण धनपाल, भुसावळ तालुका माजी मुख्याध्यापक अध्यक्ष एस.पी.भिरूड यांची उपस्थितीत होते. ही निवडणूक बिनविरोध होऊन सर्वानुमते तालुका कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. नुतन अध्यक्ष जे.पी. सपकाळे बोलताना म्हणाले की, येणाऱ्या काळात माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसह शाळेतील मुुख्याध्यापक व शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडवून तालुक्याचे कामकाज जिल्ह्यात नंबर 1 वर नेण्याचा प्रयत्न असणार आहे.
कार्यकारणी पुढील प्रमाणे
अध्यक्ष जे.पी.सपकाळे ( दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालय सूनसगाव) उपाध्यक्ष अनिल जगताप (माध्यमिक विद्यालय बोहर्डी) सचीव नितीन भालेराव ( माध्यमिक आश्रमशाळा,मांडवे दिगर) सदस्य शेख इरफान सर,(हाजी अजीज पहेलवान ऊर्दू स्कूल), सुरेखा सुर्यभान पाटील (न्याती गर्ल्स हायस्कूल कंडारी), सैय्यद नवीद (उसामा ऊर्दू स्कूल), अरूण गुरचळ (जनता हायस्कूल साक्री), सदस्य साधना लोखंडे (नेहरू विद्यालय तळलेले), एन.बी.किरंगे (के.नारखेडे विद्यालय)
या निवडीबद्दल गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान विस्तार अधिकारी किशोर वायकोळे, बी.डी.धाडी, डी.पी. साळूंखे, इब्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.आर. धनगर, शिक्षक परिषदेचे एस.एस. अहिरे, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक संजू भटकर प्रशांत नरवाडे, आर.बी.पाटील, अनिल माळी, कमलाकर सोनवणे, शरद पाटील, सुनिल वानखेडे व विविध शिक्षक संघटनेच्या वतीने गौरव करण्यात आला.