आरोग्य

भुसावळ नगरपरिषदेचे कामकाज दोन दिवस बंद

भुसावळ नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. रमण भोळे हे कोरोनाबाधीत आढळून आल्याने भुसावळ नगरपरिषदेत खळबळ उडालेली आहे. त्यांचा नगरसेवकांशी व नागरिकांशी सतत जनसंपर्क येत असतो.तसेच नगराध्यक्ष भोळे यांचा नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी असलेला व्यापक जनसंपर्क लक्षात घेता काही लक्षणे आढळलेल्या भोळे यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोरोना चाचण्या करण्यात येणार आहे.सदरील चाचण्या ह्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ नगरपरिषदेच्या कार्यालयात विविध कामानिमित्त येणारे नागरीक व पदाधिकारी यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून दि-07/09/2020 ते 08/09/2020 दोन दिवस नगरपरिषदेचे कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.अशी सूचना नोटीसा बोर्डवर मुख्याधिकारी यांनी लावलेली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.