पोलिस प्रशासन

भोंगाबंदी, मुंबई क्षेत्रात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगा बंदी,मुंबई पोलिसांचे आदेश

मुंबई दि-20 मुंबई पोलिसांनी लाऊडस्पीकर आणि त्यासंदर्भातील प्रक्षोभक वक्तव्यांसंबंधीच्या तक्रारींवर आता मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई क्षेत्रात रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत लाउडस्पीकर वाजवू नये, असे आदेश मुंबई पोलिसांनी आज दिलेले आहेत.

तसेच सायलेंट झोनमध्ये कोणालाही लाऊडस्पीकर,भोंगे लावण्याची परवानगी नसेल. याशिवाय रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण मुंबईत लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवण्याची परवानगी नसेल.जर कोणीही लाऊडस्पीकर किंवा भोंगे वाजवले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याचा अर्थ धार्मिक स्थळ असो किंवा कोणताही खासगी कार्यक्रम असतो, असं केल्यास कारवाई करण्यात येणार. सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी दिलेल्या आदेशाची मुंबई पोलिसांकडून आता सक्त अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक टीम ही तयार केली आहे. कंट्रोल रूमला जर कॉल आला तर कायदेशीर कारवाई केली जाईल.
याच दरम्यान, मुंबई पोलिसांनी समाजविघातक कृत्ये, जातीय चिथावणी आदी कामात गुंतलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. IPC कलम 144, 149 आणि 151 इत्यादी अंतर्गत समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार केला जात आहे. काही लोकांना आधीच यासंबंधित नोटीस बजावण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांचे निर्देश
अनेक धार्मिक स्थळे जसे मशिदी, मंदिरे बेकायदेशीररित्या बांधली गेली आहेत, तसेच सर्व नियमांचे पालन न करता बांधलेली आहेत, त्यांना लाऊडस्पीकरची परवानगी दिली जाणार नाही.
मंदिर आणि मशिदींमध्ये लाऊडस्पीकरला परवानगी देताना, मुंबई पोलीस रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोर पालन होत असल्याचे सुनिश्चित करणार आहे.
ज्या धार्मिक संस्था सायलेंट झोनमध्ये नाहीत, त्यांनाच लाऊडस्पीकरची परवानगी असेल. यासोबतच लाऊडस्पीकरची परवानगी घेणारी मशीद किंवा मंदिराची रचना कायदेशीर आहे की, नाही हेही पाहिलं जाणार आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.