खान्देशजळगाव

‘मंदिरात गेले प्रसाद संपला’, बाहेर आले चप्पल चोरीला ‘ गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवडून आले.मात्र त्याच रात्री एकनाथ शिंदे यांचे सह काही समर्थक आमदारांनी ‘उठाव’ करून रात्रीतून सुरतला सहलीला निघून गेले. मात्र त्यांनंतर प्रचंड राजकीय उलथापालथ होऊन शिवसेनेत ‘न भूतो न भविष्यती’ अशी ‘घरफुटी’ होऊन महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे मंत्रीपद मिळण्याच एकनाथ खडसेंचं ‘स्वप्नभंग’ झाल्याचं बोललं जात आहे. त्यातच आज भाजपचे संकटमोचक नेते आणि खडसेंचे राजकीय वैरी आमदार गिरीश महाजन यांनी खडसेंवर खोचक टिका केलेली आहे.’मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला’ अशी खडसेंची अवस्था झाल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलेलं आहे.

गिरीश महाजन नेमके काय म्हणाले?

“एकनाथ खडसे आमदार झाले, त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांना वाटलं होतं, की आपण मंत्री होऊ, खूप चांगलं काम करु, पण राजकारणात सगळ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात. ते आमदार निवडून आले आणि महाविकास आघाडीचं सरकारच कोसळलं, त्यामुळे त्यांना आमदारकीवरच समाधान मानावं लागणार आहे” असं महाजन यांनी म्हटलं आहे.
“पंगतीत बसले आणि बुंदी संपली, असं खडसेंविषयी लिहिल्याचं मी सोशल मीडियावर ऐकलंय. त्याहून पुढे जाऊन, मंदिरात गेले आणि प्रसाद संपला, बाहेर येऊन पाहिलं, तर चप्पल चोरीला, अशी अवस्था एकनाथ खडसेंची झाली आहे, पण हा योगायोग आहे. सोशल मीडियावर अशा अनेक गोष्टी लिहिल्या जातात. पण हे त्यांच्यामुळे झालं किंवा अपशकुन झाला, असं मी म्हणणार नाही” असा टोमणा गिरीश महाजन यांनी लगावला.
“मुक्ताईनगरचे अपक्ष विधानसभा आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसेंचं गाढं प्रेम आहे” असं उपरोधिकपणे गिरीश महाजन म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी राजकीय शत्रू असलेल्या खडसेंना डिवचण्यासाठी मतदारसंघात काही दिवसांपूर्वी बुंदी वाटली होती. “पंगतीत बसले आणि बुंदी संपली” या सोशल मीडियावर व्हायरल मीम्सवरुन टिपण्णी करण्यासाठीच पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बुंदीवाटप केले होते. त्यावरही गिरीश महाजन यांनी भाष्य केलं. “कोणी लाडू वाटतं, कोणी पेढे वाटतं, त्यांनी बुंदी वाटली, ग्रामीण भागात लोकांना बुंदी आवडते. त्यांची बुंदी संपली, मात्र यांच्या ताटात बुंदी पडली” असंही महाजन म्हणाले.

मोदी शाहांमुळेच शिवसेनेचे १८ खासदार

रम्यान, भाजपसोबत युती केली आणी मोदी शाहंच्या नावाचा वापर केला म्हणूनच २०१९ मध्ये शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, असा दावाही गिरीश महाजन यांनी केला. मी शिवसेनेला त्यावेळीच सांगितलं होतं, की आमच्यासोबत युती केली नाहीत, तर तुमचे दोनसुद्धा खासदार निवडून येणार नाहीत. भाजपने तुम्हाला संपवलं नाही, पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली आणि तुम्ही नैसर्गिक युती तोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत तुमचे ५५ आमदार निवडून आलेत, पण निकालानंतर तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात. त्या दिवसापासून तुमचं काऊण्टडाऊन सुरु झालं, त्यामुळेच तुमच्यावर ही वेळ आली. तुम्ही कोणाला भेटला नाहीत, खुर्चीची हवा तुमच्या डोक्यात गेली,शिवसेना मूळ हेतूपासून दूर गेल्याने तुमचे बहुतांश आमदार नाराज झाले आणी त्यामुळेच सत्तांतर घडले, अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.