मंदिर उघडण्यासाठी भुसावळात भाजपचे घंटानाद आंदोलन


दि-29/08/2020 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात गेल्या जवळपास पाच महिन्यांपासून मंदिरं, धार्मिक स्थळं बंद आहेत. राज्यातील मंदिर खुली करावीत, यासाठी आज भाजपचं राज्यभरात घंटानाद आंदोलन सुरु आहे. आजच्या आंदोलनात अनेक धार्मिक संघटना आणि संस्था सहभागी झालेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून बंद असलेली राज्यातली मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.मिशन बिगेन अंतर्गत लॉकडाऊनच्या अटी शिथिल झाल्यानंतर अनेक राज्यातील प्रमुख देवस्थानं भाविकांसाठी खुली करण्यात आली. मात्र राज्यात अद्यापही मंदिरं अथवा धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी सरकारने दिलेली नाही.त्यामुळे राज्यातील मंदिरं उघडण्याची सुबुद्धी सरकारला मिळावी आणि झोपी गेलेल्या सरकारला जाग यावी, यासाठी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडी आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आलेले आहे.
महाराष्ट्रात अनेक आध्यात्मिक संघटनांनी देवदर्शनासाठी व अनेकांच्या उपजिविका मंदिरांवर अवलंबून असल्याने महत्वाची मंदिरे खुली करावीत म्हणून राज्य शासनाला वेळोवेळी विनंती केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज राज्यभर मंदिरांच्या बाहेर घंटानाद करण्यात आलेले असून भुसावळ येथील अष्टभुजा मंदिरात आज दि-29/08/2020 रोजी सकाळी 12.30 वा भाजप नेते व माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे आणि खा.रक्षाताई खडसे आणि आ.संजयभाऊ सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.यावेळी दार उघड दार उघड उद्धवा …दार उघड अशी सामूहिक घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी याठिकाणी भाजपचे जिल्हासंघटनमंत्री प्रा.सुनिलजी नेवे सर,प्रदेश सरचिटणीस अजय भोळे,शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, शहर सरचिटणीस पवनजी बुंदेले, नगरसेवक अमोलदादा इंगळे,पुरूषोत्तमभाऊ नारखेडे,गिरीष महाजन, परिक्षीत बऱ्हाटे, बापू महाजन,अनिकेत पाटील, सतिष सपकाळे , पिंटू ठाकूर ,वसंत नेमाडे, महिला आघाडीच्या शैलजाताई पाटील व इतर सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते.