क्राईम

मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू

पाडळसे ता,यावल- यावल तालुक्यातील पाडळसे येथील एक अल्पभूधारक शेतकरी सकाळी शेतामध्ये गाई चारायला गेले असता मधमाश्यांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, यावल तालुक्यातील पाडळसे गावातील शेतकरी असलेले भागवत भास्कर काठोके हे अल्पभूधारक शेतकरी असून जोडधंदा म्हणून ते गाईचा व्यवसाय करतात. ते नेहमी प्रमाणे दिनांक 11 डिसेंबर रोजी ते सकाळी शेतामध्ये गाई चारायला गेले असता दुपारी 3 वाजेच्या सुमारास झाडावरुन अचानक त्यांच्यावर मधमाश्यांनी (आगे मोहोळ) जोरदार हल्ला चढवला होता, आणि यात ते गंभीर जखमी झालेले होते. त्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. परंतु आज त्यांचे दिनांक 13 डिसेंबर रोजी उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. मयत भागवत काठोके हे जन्मजात मूकबधीर होते. त्यांच्या घरात ते एकमेव कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली एक विवाहित मुलगा व पत्नी असा परिवार आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.