क्राईम
मध्यप्रदेश सीमेवर तपासणी नाक्यांवर कर चुकवेगीरी घोटाळा- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर – जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या आरटीओ विभागाचे दोन तपासणी नाके असून या ठिकाणाहून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात मोठ्या प्रमाणात ट्रक व इतर मोठ्या वाहनांद्वारे मालवाहतूक केली जाते. यात मालवाहतूक ट्रकसाठी 12 ते 14 टनांपर्यंतच परवानगी असून तपासणी नाक्याच्या अगोदर आणि नंतरच्या भागात कर चुकविण्यासाठी गाडीतील माल एका दुसऱ्या गाडीत उतरवून कमी केला जातो नियमानुसार ट्रक पास केला जातो.आणि नंतर पुढे तो माल एका हाॕटेलजवळ परत गाडीत भरला जातो अशा प्रकारे कर चुकवून शासनासाचा महसूल बुडविला जात आहे.यासंदर्भातील ठोस पुरावे परिवहन आयुक्तांकडे दिलेले असून या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्व अधिकारी आणि व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी परिवहन आयुक्तांकडे केलेली आहे.