मध्य रेल्वेचे महाप्रबंधक मित्तल यांचे भुसावळ येथे निरीक्षण

भुसावळ- मध्य रेल्वेचे महाप्रबंधक श्री संजीव मित्तल यांनी दिनांक-02/01/2021 रोजी भुसावळ येथे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयत विभागाचे नवीनीकृत करण्यात आलेले कंट्रोल रूम (नियंत्रण कक्ष )यांची पाहणी केली.

त्यानंतर केंद्रीयकृत निगराणी कक्ष (सीसीटीव्ही कक्ष) मेमू दोष निवारण पुस्तिका,विविध विभागाचे नियंत्रण कक्षाची पाहणी, आपत्ती व्यवस्थापन कक्षचे अनावरण करण्यात आले. सिग्नल एवं टेलिकॉम विभागाला 10000/-पुरस्कार घोषित करण्यात आला. तसेच रेल्वे हॉस्पिटल येथे मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन भुसावल मंडल द्वारा रेल्वे हॉस्पिटल साठी रूग्णवाहिकेचे लोकार्पण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन मुख्यालय अध्यक्षा श्रीमती मित्तल यांच्या द्वारे करण्यात आले.
याप्रसंगी भुसावळ मंडळ रेल्वे प्रबंधक श्री विवेक कुमार गुप्ता,अप्पर मंडळ रेल्वे प्रबंधक श्री मनोज कुमार सिन्हा,वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक श्री युवराज आर पाटील ,वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक श्री आर के शर्मा, वरिष्ठ मंडल गृह प्रबंधन इंजिनियर श्री लक्ष्मीनारायण, मंडळ सुरक्षा आयुक्त श्री क्षितिज गुरव,सर्व शाखा चे प्रमुख अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. तसेच रेलवे हॉस्पिटल मध्ये मुख्य चिकित्सा अधिक्षक श्री सामंतराय ,मध्य रेल्वे महिला संघटन भुसावळ मंडळ अध्यक्ष श्रीमती नीता गुप्ता, उपाध्यक्ष श्रीमती रजनी सिन्हा,सेक्रेटरी श्रीमती मोनिका चिखले, कोषाध्यक्ष प्रिया कदम उपस्थित होते .या निरिक्षण दौ-यात कोविड-१९ संबधित सर्व नियमांचे विधिवत पालन करण्यात आले.
