रेल्वे संबंधी

मध्य रेल्वेच्या वाढदिवशीच रेल्वेची वाहतूक विस्कळीत,मुंबईतील प्रवाशांना फटका

मुंबई दि-16 आज मध्य रेल्वेचा वाढदिवस आहे, मध्य रेल्वेने आज 170 व्या वर्षात पदार्पण केलेलं असून आजच्या दिवशी देखील रेल्वे प्रवाश्यांना फटका बसतोय, इतक्या मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळित झालेली असताना, बेस्टने अधिकच्या बस सोडल्याचे अजून जाहीर केलेले नाही.त्यामुळे प्रवासी स्टेशनवर खोळंबून आहेत, टीएमटीने देखील बसेस सुरू केलेल्या नाहीत, त्यामुळे ठाण्यातून मुंबईला जाण्यासाठी केवळ टॅक्सीचा पर्याय आहे.
मुंबईतील एक्स्प्रेस अपघातानंतर लांब पल्ल्याच्या गाड्यांचा खोळंबा, या एक्सप्रेस रद्द
एक्सप्रेस स्लो ट्रॅकवर वळवल्यानं स्लो गाड्यांचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. फास्ट लोकल वाहतूक धीम्या गतीनं आहे. तर सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजणार असल्याची माहिती आहे. कल्याण ते सीएसएमटी फास्ट ट्रॅकवरील लोकल सुरु असून सरासरी दोन तास उशिराने गाड्या आहे. अनेक एक्सप्रेस देखील सरासरी दोन तासाने उशिराने धावत आहेत.
सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या
महालक्ष्मी एक्सप्रेस दादरला सकाळी 7.15 वाजता पोहोचते मात्र ती सकाळी 8.55 वाजता पोहोचली आहे. ठाणे ते माटुंगा दरम्यान अनेक स्लो गाड्या रांगेत आहेत. सिग्नल मिळत नसल्यानं अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळं मुंबईकरांची मोठी अडचण झाली आहे. अनेक जण स्टेशन टू स्टेशन पैदल वारी करत असल्याचं दिसून आलं आहे. पीक अव्हरमध्ये चाकरमान्यांना मोठ्या प्रवासा दरम्यान वेळ खर्ची घालावा लागणार असून सोबतच अनेक अडचणींचा सामना देखील करावा लागण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं की, सीएसएमटी ते कल्याण फास्ट ट्रॅक सुरु व्हायला दुपारी 12 वाजण्याची शक्यता आहे.त्यांनी टीएमसी आणि मुंबई महापालिकेला आवाहन केलंय की बसेसची संख्या वाढवावी. स्लो ट्रॅकवर सकाळी 8.10 मिनिटांआधीच्या एक्सप्रेस गाड्या वळवल्या होत्या. कल्याण ते सीएसएमटी फास्ट गाड्यांची वाहतूक सुरु करण्यात आलीय, मात्र वेळापत्रक सुरळीत होण्यास काही वेळ जाऊ शकतो. झालेल्या दुर्घटनेची चौकशी होईल, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच काही ठोस असं सांगता येईल, असं शिवाजी सुतार यांनी सांगितलं आहे.

या अपघातामुळे काल रात्रीपासून या एक्स्प्रेस रद्द झालेल्या आहेतया

मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस Manmad-Mumbai Panchvati Express

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस Pune-Mumbai Sinhagad Express

मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस Mumbai-Pune Sinhagad Express

मनमाड-मुंबई समर स्पेशल Manmad-Mumbai Summer Special

मुंबई- मनमाड समर स्पेशल Mumbai-Manmad Summer Special

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.