मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांची भुसावळ विभागात वार्षिक तपासणी

भुसावळ- मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी भुसावळ विभागातील इगतपुरी-मनमाड विभागावर दिनांक १५.१.२०२१ रोजी वार्षिक तपासणी केली. या तपासणी दरम्यान सर्व विभागांचे प्रधान प्रमुख, श्री.विवेक कुमार गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, भुसावळ विभाग आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
श्री मित्तल यांनी घोटी- पाडळी विभागातील वळण आणि छोट्या पुलाची तपासणी केली त्यानंतर देवळाली व नाशिक रोड स्थानकांची तपासणी केली. महाव्यवस्थापकांनी देवळाली येथील गँग हट / गँगमन आणि ट्रॅकमन यांच्यासाठी विश्राम गृहाची पाहणी केली. त्यांनी देवळाली येथील राजभाषा व संरक्षा प्रदर्शनाला भेट दिली व तसेच नाशिकरोड येथील ओएचई डेपो, रूट रिले इंटर लॉकिंग व रेल्वे कॉलनीची देखील पाहणी केली.
गोदावरी पुलाची तपासणी व त्यानंतरची हाय स्पीड रन चाचणी, तदनंतर महाव्यवस्थापकांनी मनमाड येथील स्टेशन परिसर, अपघात निवारण ट्रेन, रनिंग रूम व रेल्वे शाळेची ई-लर्निंग डिस्प्लेची पाहणी केली.

श्री मित्तल यांनी खासदार डॉ भारती पवार आणि आमदार श्रीमती सरोज अहिरे यांना नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे आणि मनमाड रेल्वे स्टेशन येथे आमदार श्री सुहास कांदे यांना भेट दिली आणि रेल्वेशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली.

भुसावळ येथे श्री मित्तल यांनी लोकप्रतिनिधी, मान्यताप्राप्त संघटना आणि व्यापारी संस्था यांच्याशी संवाद साधला आणि वेबलिंकद्वारे माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले. वर्ष २०१९-२०२० दरम्यान केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी पात्र रेल्वे कर्मचार्यांना पुरस्कारही प्रदान केले.
तपासणी दरम्यान सर्व कोविड नियमांचे विधिवत पालन करण्यात आले.