क्राईम

मनुदेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांची अॅपेरिक्षा पलटी,आठ जखमी

यावल- तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री मनुदेवी मंदीरावरून दर्शन घेवून परत येणाऱ्या भाविकांची रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात सहा महिलांसह एक वर्षाची मुलगी आणि एक १३ वर्षाचा मुलगा जखमी झालेला असुन या अपघातात जखमी झालेल्या एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान याबाबत मिळालेली माहिती अशी की आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास सौ .अरूणा मदन सपकाळे (वय 45) रा. खडका ता भुसावळ,सौ.लक्ष्मी प्रभाकर सपकाळे,(वय 42) रा.खडका ता भुसावळ ,सुनिता महादेव पटोळे ,गायत्री महादेव पटोळे आणी रिषीकेश महादेव पटोळे (वय 13) सर्व रा. किन्ही ता.भुसावळ आणी एक वर्षाची लहान चिरमुडी असे एकुण सात ते आठ जणं हे आडगाव येथील प्रसिद्ध देवस्थान श्रीमनुदेवीचे दर्शन घेऊन ही सर्व मंडळी अॕपे रिक्षाने भुसावळकडे निघाले असता आडगाव ते श्रीमनुदेवी चौफुली रस्ता दरम्यान अॅपेरिक्शा वाहनाचे एका वळणा संतुलन बिघडल्याने वाहन पलटी होवुन त्यात सहा ते सात जण जख्मी झाले असुन ,जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेव्दारे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलेले आहे. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिडके यांनी आपल्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या मदतीने प्रथमोपचार केलेले असुन यातील एक महिले प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.या संदर्भात पोलीसात अद्याप कुठल्याही प्रकारची नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.जखमींना यावलच्या रुग्णालयात दाखल केले असता वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे हे जखमींच्या मदतीसाठी धावून आलेत.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.