कोल्हापूरठाणेनिवडणूकमुंबईराजकीयसातारा

मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची ही अवस्था झाली नसती- संभाजीराजे छत्रपती

मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर शिवसेनेची ही अवस्था झाली नसती- संभाजीराजे छत्रपती

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाने शिवसेनेसाठी संघर्षाचा काळ सुरु आहे. ‘शिंदेशाही’च्या शक्तीप्रदर्शनापुढे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हतबल आहेत. अशातच संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या जमखेवर मीठ चोळलेलं आहे. मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर आज शिवसेनेची हीअवस्था झाली नसती. एवढं मोठ सगळं प्रकरण घडलं नसतं, असं म्हणत संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं आहे.विशेष म्हणजे संभाजीराजे छत्रपतींना राज्सभेसाठी शिवसेनेने पाठिंबा द्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे भेटीसाठी गेलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि संभाजेराजे समर्थक यांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांनीच केले होते.परंतु त्यास मुख्यमंत्री ठाकरे यांनी नकार दिलेला होता.अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे.
मुंबई, मराठवाडा, खान्देश, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र अशा सगळ्याच विभागांतून 40 पेक्षा जास्त आमदार फोडून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला कधी नव्हे तेवढे मोठे खिंडार पाडलेलं आहे. मातोश्रीचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ भाईंचे विश्वासू रविंद्र फाटक यांनीही चर्चा केल्यानंतर भाईंचं समाधान झालेलं नाही. आम्ही दिलेल्या ऑफरवर शिवसेना नेतृत्वाने विचार करावा नाहीतर परतीचे दोर कापले आहेत असं समजावं, असा थेट निरोपच शिंदे यांंनी नार्वेकरांमार्फत उद्धव ठाकरेंना कळविला असल्याचं छत्रपती यांनी सांगितले. एकनाथ शिंदे काही केल्या ऐकायला तयार नाहीत हे पाहून उद्धव ठाकरे यांनीही विधानसभा बरखास्तीच्या दिशेने पाऊलं टाकायला सुरुवात केली आहे.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.