महापुरूषांचा विनापरवानगी पुतळा बसविला,पोलिसांची घटनास्थळी धाव

मुक्ताईनगर – तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे अज्ञात लोकांनी रात्री महापुरूषाचा पुतळा स्थापित केल्याचा प्रकार आज उघडकीस आला असून पोलिसांनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळविलेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्तअसे की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द या गावात रात्रीच्या सुमारात अज्ञात लोकांनी विनापरवानगी महापुरूषांचा पुतळा स्थापित केला.आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सकाळीच घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संबंधीत पुतळा काढण्याचे काम सुरू केल्यानंतर गावात काही काळ तणाव पसरला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आता परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे. पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतलेला आहे.गावात तणाव पूर्ण शांतता असून या घटनास्थळी जिल्हा पोलिस अधिक्षक डाॕ प्रविण मुंढे,अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देऊन पाहणी केलेली आहे.गावात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.