आरोग्य

महामार्गावर युवकाचा गंभीर अपघात, ॲड.रोहिणी खडसे यांनी केली अपघात ग्रस्ताला रुग्णालयात नेण्यासाठी मदत

जळगाव -राष्ट्रीय महामार्ग क्र 6 तरसोद ते मुक्ताईनगर दरम्यान चौपदरीकरण झाले असुन नविन रस्त्यावरून वाहनधारक भरधाव वेगाने वाहने चालवत असतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असुन दररोज छोटे मोठे अपघात होतअसल्याचे दिसून येत आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज (दि 23) रोजी मुक्ताईनगर येथील त्रिशुल (विकी) मराठे हा युवक भुसावळ वरून मुक्ताईनगर येथे दुचाकीवरून येत असताना बोहर्डी फाटा येथील उड्डाणपुलावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन पडला होता, यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर या त्या मार्गाने जात असताना त्यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी लगेच मुक्ताईनगर येथून रुग्णवाहिका बोलावून विकी मराठे यांना पुढील उपाचारासाठी भुसावळ येथे रुग्णालयात रवाना केले .यावेळी पं स माजी सभापती राजेंद्र माळी, शिवराज पाटील व बोहर्डी ग्रामस्थांनी मदत केली.
ॲड.रोहिणीताई खडसे यांनी दाखवलेल्या सतर्कतेबद्दल त्यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात मुक्ताईनगर बोदवड रस्त्यावर झालेल्या अपघातातील जखमी व्यक्तींना रुग्णालयात नेण्यासाठी सुद्धा रोहिणी खडसे यांनी मदत केली होती

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.