निवडणूकमुंबईराजकीय

महाराष्ट्राचा ‘शॅडो मुख्यमंत्री’
(Shadow CM) आता कोण होणार ? राष्ट्रवादीचा होणार की शिवसेनेचा ?

अजित पवारांचे नाव आघाडीवर

मुंबई : शिवसेनेच्या फुटलेल्या 39 आणी 10 सहयोगी अपक्ष आमदारांच्या गटाने वेगळी भूमिका घेतल्याने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेला होता.त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून राज्याचा कारभार सांभाळणारे ठाकरे सरकार परवा कोसळले आहे. काल घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.तसेच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.त्यामुळे ते आता सत्तेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे विरोधीपक्ष नेते पद आता खाली झालेले आहे.

Advertisement by sponsored

हे पण वाचाएकनाथ शिंदे गोव्याहून महाराष्ट्रात एकटे आले,मात्र जाताना मुख्यमंत्रीपद सोबत घेऊन गेले


विरोधीपक्ष नेते पदाचे महत्व वाढलेय
महाराष्ट्राचे राजकारण हे कधी नव्हे इतके विरोधी पक्षनेत्याभोवती केंद्रित राहिले होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या जाण्यानंतर महाराष्ट्राचा पुढचा विरोधी पक्षनेता कोण असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद होते. त्यामुळे आता विरोधी पक्षात गेल्यानंतरही राष्ट्रवादीचे विधिमंडळातील सर्वोच्च पद हे अजित पवारांकडेच राहील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपद गेले तरी अजित पवार यांचे वैयक्तिकरित्या फारसे नुकसान होणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विरोधी पक्षनेता हा म्हणजे एकप्रकारे ‘शॅडो मुख्यमंत्री’ असतो, असे राजकारणात सर्रास म्हटले जाते. या पदाची ताकद आणि प्रभाव काय असू शकतो, हे देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या अडीच वर्षांमध्ये दाखवूनच दिले आहे. त्यामुळे अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळणे, ही त्यांच्यासाठी आणखी एक मोठी संधी असू शकते. आता अजित पवार विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार का ? विरोधी पक्षनेता म्हणून किती प्रभावीपणे काम करणार ? हे येणारा काळच स्पष्ट करेल. अजित पवारांनी हे पद न स्वीकारल्यास ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे जाऊ शकते. जयंत पाटील यांनाही सभागृहातील राजकारणाचा अनेक वर्षांचा दांडगा अनुभव आहे.

हे पण वाचा : आषाढीला पंढरपूरला आरती कोणता मुख्यमंत्री करणार ?

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.