आरोग्य
महाराष्ट्रात पुढील आठवड्यात 4 दिवस कोरोना लसीकरण सत्र

https://twitter.com/MahaDGIPR/status/1350511432169779201?s=08
ऑफलाईन माध्यमातून लसीकरण न करण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, सुरुवातीला आठवड्यातून चारच दिवस लसीकरण करण्याबाबतही केंद्राच्या सूचना आलेल्या आहे. आजही कोविन अॅपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवत असल्याचे निदर्शनास आले. कोविन अॅपमध्ये लाभार्थ्यांचे नाव सेव्ह होते. मात्र, ते स्क्रिनवर दिसत नाही.
पहिल्या दिवशी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 18 हजार 338 हून अधिक म्हणजे सुमारे 64 टक्के कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षीत असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.