आरोग्य

महाराष्ट्रात आज कोरोनाचे 111 बळी,तर 35952 नवे कोरोनाबाधीत आढळले

मुंबई दिः 25 महाराष्ट्रात आज २०,४४४ रुग्ण बरे होऊन घरी गेलेले असून राज्यात आजपर्यंत एकूण २२,८३,०३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.७८ % एवढे झालेले आहे. आज राज्यात ३५,९५२ नवीन कोरोनाबाधीत आढळलेले असून गेल्या सहा महिन्यातील ही सर्वोच्च संख्या आहे. राज्यात आज तब्बल १११ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झालेली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८८,७८,७५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,००,८३३ (१३.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,६२,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,७७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.