जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप ! ‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या वृत्ताने खळबळ

एकनाथराव खडसेंचा भाजप प्रवेश झाला ?

जळगाव, दिनांक 3 एप्रिल गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेले राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार एकनाथराव खडसे हे येत्या काही तासांमध्ये भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. याबाबतचे वृत्त भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी दुजोरा दिल्याच्या हवाल्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राने प्रकाशित केलेले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाचे उपसंपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रफुल्ल मारपकवार यांनी भाजप पक्षश्रेष्ठींच्या हवाल्याने सदरील वृत्त प्रकाशित केलेले आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या या वृत्ताची लिंक खाली दिलेली आहे.

http://3.5 years on, Fadnavis rival Khadse headed back to BJP – https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/3-5-years-on-fadnavis-rival-khadse-headed-back-to-bjp/amp_articleshow/108985900.cms?utm_source=whatsapp&utm_medium=social&utm_campaign=AmpArticleshowicon

त्यामुळे आता एकनाथराव खडसे हे खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार की प्रवेश करून आलेले आहेत याबाबत चर्चांना उधाण आलेले आहे. काल रात्री एकनाथराव खडसे हे दिल्लीहून परतलेले असून ते आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. ते आज होणार असलेल्या पत्रकार परिषदेत कोणता खुलासा करतात याकडे जळगाव जिल्ह्यासह राज्यातील राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या नजरा लागून आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात अनेक मोठ्या उलथापालखी होणार असल्याचे संकेत मिळालेले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकारणातील कट्टर प्रतिस्पर्धी, एकनाथ खडसे  हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटातून पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले आहेत, त्यांच्या घरवापसीचा आम्हाला आनंद आहे, असे प्रफुल्ल मारपकवार यांनी टाइम्स ऑफ इंडियातील लेखात प्रकाशित केलेले आहे.
एकनाथराव खडसे यांनी पक्षावरील टीका कमी केल्याने आणि त्यांची सून रक्षा खडसे यांच्या विरोधात रावेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिल्यानंतर ते भाजपमध्ये परतणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामधून भाजपमध्ये परतणे ही काळाची बाब आहे, असे भाजपच्या एका नेत्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना सांगितले आहे, तसेच एकनाथ खडसे यांनीही त्यांच्या जुन्या पक्षात घरवापसी करण्याची पुष्टी नाकारली नाही असा दावा या वृत्तात केलेला आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपची बांधणी करण्यात खडसे यांचा हात होता आणि त्यांचे पुन्हा स्वागत केले जाईल, असे भाजपचे नेते म्हणालेले आहे त. “भाजप नेतृत्व खडसेंच्या बाबतीत  सकारात्मक आहे. त्यांना लवकरच पक्षात सन्मानपूर्वक सामील केले जाईल,” असे भाजपचे दिल्लीतील वरीष्ठ नेते म्हणालेले आहेत. असा दावा या टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात करण्यात आलेला आहे.

आमदारकीचा राजीनामा दिला का ?

आमदार एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादीकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला की नाही ?याबाबत अजूनही साशंकता आहे. आज एकनाथराव खडसे याबाबत असत्या खुलासा करणार आहेत त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
गेल्या काही वर्षांपासून उपमुख्यमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, चाळीसगावचे आमदार आणि जिल्हा दूध संघाचे चेअरमन मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंच्या विरोधात कट्टर राजकीय भूमिका घेतलेली होती. तसेच एकनाथराव खडसे यांनीही त्यांच्या विरोधात जोरदार घणाघाती टीका केलेली होती. काल झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलेल आहे की, एकनाथराव खडसे हे भाजपात आल्यास ‘ते बूथप्रमुखाला सुद्धा ज्युनिअर असतील’ त्यामुळे येणाऱ्या काळात काय घडामोडी घडतात. याकडे जळगाव जिल्हा राज्यातील राजकीय नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहेत.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button