आरोग्य
महाराष्ट्रात 24 तासात 346 पोलिस कोरोनाबाधीत

मुंबई (वृत्तसंस्था-)महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून झपाट्याने रुग्णांचा आकडा वाढत आहे.याच दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 346 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली असून दोन जणांचा गेल्या 24 तासात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. पोलीस दलात कोरोना पॉझिटिव्हची एकूण संख्या ही 14 हजार 641 वर पोहचली आहेत. तसेच 2 हजार 741 अॅक्टिव्ह रुग्ण असून 11 हजार 752 जणांची प्रकृती सुधारली आहे. दरम्यान; आतापर्यंत 148 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना मुळे मृत्यू झालेला आहे.अशी माहिती महाराष्ट्र पोलिस दलाच्या सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.