मुंबई

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाची बैठक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई दि. 13: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या संचालक मंडळाची 152 वी बैठक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अध्यक्ष श्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

मंत्रालय येथे झालेल्या बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल,  जलसंधारण विभागाचे सचिव डॉ. दिलीप पांढरपट्‌टे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, मुख्य प्रशासकीय अधिकारी दीपाली देशपांडे-सावर्डेकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंजूरीसाठी विविध विषय ठेवण्यात आले होते. जल जीवन मिशनची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे व योजना काळातील कामे पूर्ण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे, तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांना दि. 1 जानेवारी 2016 ते 31 मार्च, 2017 या कालावधीतील सातवा वेतन आयोग सुधारित वेतन संरचना मंजूर करणे आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली.

Follow us Mediamail Social👇
आणखी पुढे वाचा
Check Also
Close
Back to top button
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.