सामाजिक उपक्रम

महिलांना कर्जासोबत शेअरही मिळवून देणारी स्त्रीधन निधी बँक योजना

रेमन मॕगसेसे पुरस्कार विजेत्या महिलेचा उपक्रम

जळगाव – ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना घर बसल्या रोजगार निर्मिती व्हावी या साठी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील रेमन मॕगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी मिर्च मसाला रोजगार अभियान आणि स्त्रीधन निधी बँकेची स्थापना करून अनोखा उपक्रम सुरू केला असून त्याचा आज जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात शुभारंभ करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरी आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर अनेकांच्या नोकऱ्या आणि व्यवसाय डबघाईस आल्याने संपूर्ण अर्थ चक्र बिघडले असल्याचं अनेक घरात पाहायला मिळत आहे,या सर्व सामान्य कुटुंबाना आपल जगणं कठीण झालं आहे. यावर उपाय म्हणून बचत गटाच्या माध्यमातून हजारो महिलांना रोजगार देणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर च्या नीलिमा मिश्रा यांनी महिलांना घरबसल्या रोजगार निर्मिती व्हावी यासाठी मिर्च मसाला रोजगार अभियान आणि स्त्रीधन निधी बँकेची स्थापना करून घरबसल्या रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे
या दोन्ही उपक्रमाचा आज जळगाव जिल्ह्यातील बहादरपूर येथे शुभारंभ करण्यात आला आहे.
साधारण वीस वर्षांपूर्वी बचत गट सुरू करते वेळी ,ज्या महिलांनी नीलिमा मिश्रा यांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेऊन आज पर्यंत ज्यांनी यशस्वी पने साथ दिली होती अशा सात महिलांच्या हस्ते या दोन्ही उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या पहिल्याच दिवशीच महिलांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचं पाहायला मिळाले आहे.
मीर्च मसाला रोजगार अभियानात नीलिमा मिश्रा यांच्या भगिनी निवेदिता संस्थेच्या माध्यमातून निर्मिती केल्या गेलेल्या तिखट,हळद आणि धना पावडर ची महिलांनी खरेदी करावयाची आहे,या व्यवहारात कोणताही दलाल मध्ये नसल्याने मिळणारा नफा थेट ग्राहकांना शेअर रुपात वाटला जाणार आहे. कोणत्याही भेसळ नसलेल्या शुद्ध मालाची बाजार भाव पेक्षा कमी किमतीत याची विक्री केली जाणार आहे. तसेच हा माल खरेदी करणाऱ्या कोणत्याही महिलेला प्रती किलो मागे पन्नास रुपयांचे शेअर हे मिळणार असून दर वर्षी त्यावर मिळणाऱ्या नफ्याच्या दहा टक्के पेक्षा जास्त लाभांश दिला जाणार आहे.
बचत गटाच्या महिलांच्या बचती मधून महिलांच्या उन्नती साठी स्त्रीधन निधी या बँकेची स्थापना करण्यात आली असून या मध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कर्ज रूपाने अर्थ सहाय्य पुरविले जाणार आहे,त्याच बरोबर ठेवी ही घेतल्या जाणार असून महिलांच्या रोजगार निर्मिती साठी केवळ राज्य भरातच नव्हे तर संपूर्ण देश भरात स्त्री धन निधी बँकेच्या स्थापना केल्या जाणार असल्याची माहिती रेमन मॕगसेसे विजेत्या नीलिमा मिश्रा यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात पारोळा तालुक्यात बहादरपूर येथे आज झालेल्या मीर्च मसाला रोजगार अभियान आणि स्त्रीधन निधी बँकेच्या शुभारंभ प्रसंगी पहिल्याच दिवशी ग्रामीण भागातील महिलांनी मोठा प्रतिसाद देत तिखट,हळद आणि धने पावडर खरेदी करून त्यावर शेअर मिळविले आहेत.
बाईट
नीलिमा मिश्रा
बचत गटाच्या माध्यमातून रेमन मॕगसेसे पुरस्कार विजेत्या

Show More

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close

Adblock Detected

Its Sorry to say Please help to stop adblock and disable it Please.